Pimpri : डेक्कन जिमखाना संघाचा पराभव करत व्हेरॉक वेंगसरकर संघाने जिंकला पहिला सामना

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड चे व्हेरॉक वेंगसरकर (Pimpri) अकादमी तर्फे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. काल दिनांक 26 एप्रिल2023, मंगळवार रोजी पहिला सामना झाला. ही स्पर्धा 16 वर्षाच्या खालील वयोगटासाठी आहे. स्पर्धेचे सर्व सामने हे थेरगाव येथील व्हेरॉक मैदानावर होणार आहेत. काल उद्धाटनाच्या वेळी स्पर्धेला उत्तम अशी सुरुवात झाली.

स्पर्धेच्या उद्धाटनाला पिंपरी चिंचवड मनपाच्या स्थापत्य विभागाकडून वैशाली ननावरे आणि राजश्री सातळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते  स्पर्धेचे उद्घाटन झाले. व्हेरॉक अकादमीचे प्रशिक्षक चंदन गंगावणे, शादाब शेख,  चिंतामणी वैद्य आणि डॉ. विजय पाटील हे देखील उपस्थित होते. स्पर्धेचा पहिला सामना हा डेक्कन जिमखाना क्रिकेट संघ विरुद्ध व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी यांच्यात झाला.

Pune : आईवरून शिवीगाळ केल्याने ज्येष्ठ नागरिकाची हत्या; 32 वर्षीय तरुण अटकेत

 

45 शतकांच्या सामन्यांमध्ये व्हेरॉक ने पहिली फलंदाजी केली. सामनावीर ठरलेला अद्विक तिवारी याने व्हेरॉक कडून चांगली कामगिरी करत 80 चेंडूंमध्ये 61 धावा काढत गोलंदाजीतही 3 बळी घेतले.  व्हेरॉक कडून आरव धनकुडे आणि अर्णव डोळे यांचा योगदानामुळे व्हेरॉक217 या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचली. डेक्कन संघाची फलंदाजी जास्त प्रभावी ठरली नाही आणि ते फक्त 144  धावांवर पूर्णबाद झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.