Pune : आईवरून शिवीगाळ केल्याने ज्येष्ठ नागरिकाची हत्या; 32 वर्षीय तरुण अटकेत

एमपीसी न्यूज-पुण्यातील कोंढवा परिसरात दोन दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाची डोक्यात फरशी (Pune) घालून हत्या करण्यात आली होती. हकीमद्दिन बारोट (वय 66) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव होतं. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा छडा लावण्यात कोंढवा पोलिसांना यश आला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी महेश ओव्हाळ (वय 32) याला अटक केली आहे. आई वरून शिवीगाळ केल्याने हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

IPL 2023 : गुजरात चा मुंबई इंडियन्स वर दमदार विजय ; मुंबईचा सलग दुसरा पराभव

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिसोळी येथे एका ज्येष्ठ नागरिकाचा डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला होता. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती. सुरुवातीला या संपूर्ण घटनेविषयी कोणतीच माहिती मिळत नव्हती. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात विचारणा केली परंतु याविषयी कोणीही उघड उघड बोलण्यास तयार नव्हते.
दरम्यान कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याला हकीमुद्दीन यांचा खून त्यांच्या मित्रानेच केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी महेश ओव्हाळ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. आरोपी आणि मयत दोघेही नेहमी मद्यपान करीत होते. रविवारी रात्री मद्यपान केल्यानंतर मयत व्यक्तीने आरोपीला आईवरून शिवीगाळ केली होती. याच रागातून आरोपीने डोक्यात (Pune) फरशी मारून खून केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.