IPL 2023 : गुजरात चा मुंबई इंडियन्स वर दमदार विजय ; मुंबईचा सलग दुसरा पराभव

एमपीसी न्यूज -25  एप्रिल 2023  मंगळवार रोजी झालेल्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सने मुंबई इंडिअन्सला 55 धावांनी हरवले. गुजरात ने स्वतःचे 7 पैकी 5  सामने जिंकून पॉईंट्स टेबल वर 2 रे स्थान मिळवले आहे. मुंबई इंडिअन्सची (IPL 2023)  सुरुवात काही एवढी चांगली झालेली नाही असे म्हणू शकतो. आत्तापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये मुंबईने केवळ 3 च सामने जिंकले आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतला.

 

 

पहिली फलंदाजी करायला उतरलेल्या गुजरातची सुरुवात पाहिजेल तशी झाली नाही. वरिद्धिमान सहा ( 4 धावा ) आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आलेला गुजरातचा हार्दिक पंड्या ( 13 धावा ) काही दीर्घवेळ टिकले नाहीत. विजय शंकर ( 19 धावा ) हि स्वतःचा प्रभाव सामन्यामध्ये दाखवू शकला नाही. परंतु सलामीवीर शुभमन गिल याचा केवळ 34  चेंडूंमध्ये 56  धावा आणि डेविड मिलर केवळ 22  चेंडूंमध्ये 46 धावा या तुफानी खेळींमुळे गुजरातला हवे ते संतुलन मिळाले. अभिनव मनोहर याने देखील उत्कृष्ट कामगिरी करत २१ चेंडूंमध्ये ४२ धावा काढल्या. राहुल तेवातीया याचा २० धावांच्या कॅमेओमुळे गुजरात 207 या विशाल धावसंख्येवर पोहोचली. मुंबईकडून गोलंदाजी करताना फिरकी गोलंदाज पियुष चावला याने 2 बाली घेतले तर अर्जुन तेंडुलकर, जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ यांनी प्रत्येकी एक बाली घेतला.

Talegaon News : नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आधार कार्ड मशीनची संख्या वाढवा

विशाल लक्षाचा पाठलाग करताना मुंबईचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा ( 2 धावा ) आणि ईशान किशन (13 धावा ) काही प्रभाव न करता स्वस्तात बाद झाले.  कॅमरून ग्रीन याने 26 चेंडूंमध्ये 33  धावा काढल्या आणि आयपीएल मध्ये तो जे कॅमेओ दाखवत आहे ते कायम ठेवले. इम्पॅक्ट प्लेअर तिलक वर्मा (2 धावा ) , सूर्यकुमार यादव ( 22 धावा ), टीम डेव्हिड ( ० धाव ) यांनी सुद्धा अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. नेहाल वढेरा ने लक्षच पाठलाग करायचा हेतूने 21 चेंडूंमध्ये 40 धावा काढल्या. प्रेक्षकांना अर्जुन तेंडुलकर ( 11 धावा) याची ही फलंदाजी बघायला मिळाली. गुजरात कडून गोलंदाजी करताना नूर अहमद ने 3 बळी घेतले तर रशीद खान आणि मोहित शर्मा ने प्रत्येकी 2 बळी घेतले. कर्णधार हार्दिक पंड्यानेही 1 बाली घेतला आणि गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे गुजरात टायटन्स हा सामना 55 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकले.

मुंबई इंडिअन्सची या वर्षी गाडी चुकीच्या दिशेला चाललेली दिसत आहे. त्यांचे बरेच फलंदाज त्यांचा कडून अपेक्षित असलेली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत. याच उलट बघायला गेले तर गुजरात टायटन्स ने मागच्या वर्षी सारखाच या वर्षीही धुमाकूळ घातला आहे. त्यांचे आणि प्रथम क्रमाकावर असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स यांचे गुण सामान असून नेट रनरेटच्या फरकामुळे गुजरात द्वितीय स्थानी आहे. मुंबई आणि चेन्नईने   (IPL 2023)  सलग दोन वेळा आयपीएल चषक जिंकण्याचा केलेला विक्रम गुजरात करण्याचा क्षमता ठेवते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.