Pune : जीएसटी क्रमांक मिळवून देण्यासाठी तीन हजारांची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – जीएसटी नंबर मिळवून देण्यासाठी तीन हजारांची ( Pune) लाच घेणाऱ्या महिला राज्यकर अधिकारीला बुधवारी (दि.6) रंगेहात अटक कऱण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत  विभागाने येरवडा येथील वस्तू व सेवाकर (जीएसटी) कार्यालय येथे करण्यात आली.

मालती रमेश कठाळे (वय 43 रा.येरवडा) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Pune : स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती

पेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे त्यांच्या पत्नीच्या नावे जीएसटी क्रमांक घेऊ इच्छित होते. यासाठी त्यांनी जीएसटी कार्यालयात ऑनलाईन अर्ज व 2 हजार 500 रुपये भरले. मात्र हा अर्ज प्रलंबीत ठेवण्यात आला.

पुढे मालती काठाळे यांनी तक्रारदाराला समक्ष भेटण्यासठी बोलावले व क्रमांक मिळवण्यासाठी 3 हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून कार्यालयातच रंगेहात अटक करण्यात आली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत ( Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.