Pune : स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा (Pune) निवडणूक अधिकारी कार्यालय, वर्शिप अर्थ फांउडेशन, निवडणुक साक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मतदारांचे स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने बालगंधर्व रंगमंदीर ते डेक्कन दरम्यान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी अधिकाधिक युवा मतदारांनी मतदान करावे; आपल्या परिसरातील सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन यावेळी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी केले.

Moshi : महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या सख्या भावांना अटक

श्रीमती तांबे म्हणाल्या, मतदान प्रक्रीयेमध्ये अधिकाधिक युवकांना सहभागी करुन मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्याच्यादृष्टीने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. निवडणुक साक्षता मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात मतदार नोंदणीच्याअनुषंगाने चांगले काम करण्यात आले आहे.  भारत निवडणूक आयोगाच्यावतीने मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांना प्राधान्याने मतदान करता येणार आहे. आचारसंहिता कालावधीत निवडणुकीच्या अनुषंगाने अनुचित प्रकार घडल्यास त्याविषयी ‘सी-व्हिजिल ॲप’ वर तक्रार नोंदविता येणार आहे.  आपल्या मतदारसंघातील उमेदवारांची माहिती ‘केवायसी ॲप’वर देण्यात येते.

भारत निवडणूक  आयोगाच्या https://www.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा ‘वोटर हेल्पलाईन ॲप’ वर नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करता येते. प्रत्येक नव मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये असल्याबाबत यात्री करुन घ्यावी, अशी माहिती तांबे यांनी दिली.

शिवाजीनगरचे सहायक निवडणूक अधिकारी दादासाहेब गीते म्हणाले, निवडणुकीच्यावेळी महिला मतदारांनी अधिकाधिक प्रमाणात मतदान करण्याच्यादृष्टीने जनजागृतीकरीता या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रत्येक महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा. तरुण पिढीने परिसरातील सर्व घटकातील नागरिकांना जबाबदारीपूर्वक मतदान करण्याबाबत प्रोत्साहीत करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पदयात्रेदरम्यान विविध घोषवाक्यांचे घोषणाफलक घेवून मतदान करण्याचा संदेश दिला. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन केले.  विद्यार्थ्यांना मतदान करण्याबाबत शपथही देण्यात (Pune) आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.