Pune : महादेवनगर येथील पाण्याच्या टाकीचे आणि जलवाहिन्यांची कामे अंतिम टप्प्यात

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक ४१ कात्रज सर्व्हे क्रमांक ३१ मधील महादेव नगर येथील ६० लाख लिटर पाण्याच्या टाकीचे काम आणि जलवाहिनिंची कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत.

वडगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून पुणे शहरामधील बर्याच भागांना म्हणजेच सिंहगड रस्ता, धनकवडी गावठाण, आंबेगाव पठार, आंबेगाव बुद्रुक, टिळेकर नगर, बालाजी नगर, दत्तनगर, संतोष नगर, आंबेगाईन खुर्द, कोंढवा खुर्द, येवलेवाडी, कात्रज गावठाण, सुखसागरनागर, दत्तनगर, गुजर वाडी, निंबाळकर वाडी, इत्यादी भागांना पाणी पुरवठा होतो.

हा पाणी पुरवठा विविध ठिकाणी असलेल्या साठवण टाक्यांमधून करण्यात येतो. मात्र, या टाक्यांवरचा भार कमी करणे, सर्व भागांना अधिक सुरळीत व नियमित पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने महादेव नगर येथे ६0 लाख लिटरच्या टाकीचे बांधकाम पुणे महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात आलेले आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी साठवण क्षमता वाढावी या उद्देशाने चालू करण्यात आलेले हे काम आता पूर्णत्वास आलेले आहे. राजस सोसायटी, सर्वोदय सोसायटी, गुजरवाडी रस्ता, गोकुलनगर, इत्यादी भागांना महादेव नगर टाकीतून पाणी पुरवठा होणार असल्याने केदारेश्वर टाकी वरचा भार बराच कमी होणार आहे. त्याच बरोबर महादेवनगर टाकीला फीडिंगसाठी व वितरणासाठी आवश्यक असलेल्या नलिका टाकण्याचे काम जागेवर जोरात सुरू आहे.

लवकरच हे काम पूर्ण होऊन वर नमूद केलेल्या भागांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अधिक सुरळीत व नियमित पाणी पुरवठा प्राप्त होऊ शकणार आहे. कोरोना आजाराने पुण्यामध्ये थैमान मांडलेले असताना नागरिकांच्या गरजेला प्राधान्य देऊन पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागमार्फत हे काम हाती घेण्यात आलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.