Thane: Good News! गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई!

Thane: Good News! State Minister Jitendra Awhad wins battle against Corona!

एमपीसी न्यूज – राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्याच्या मंत्र्याला कोरोनाची बाधा होऊनही त्याबाबत माध्यमांमध्ये फारशा बातम्या येऊ न देण्याची खबरदारी सरकारकडून घेण्यात आली होती. स्वतः आव्हाड यांनीच आज ट्वीट करून त्यांना कोरोना झाला होता, हे मान्य केले.

जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने 13 एप्रिलपासून त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल निगेटीव्ह आला होता. त्यानंतर 21 तारखेला त्यांना पुन्हा ताप आला व अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यावेळी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात आव्हाड हे कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत काही माध्यमांनी बातम्या दिल्या होत्या, मात्र त्याला शासनाकडून अधिकृत दुजोरा देण्यात येत नव्हता. उपचारानंतर आव्हाड आता बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यांना एक महिना पूर्ण विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

यासंदर्भात स्वतः आव्हाड यांनी ट्वीट करून आपले मित्र, चाहते व कार्यकर्ते यांना माहिती दिली आहे.

अपने कदमों के काबिलियत पर विश्वास करता हूं….

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया.

माझ्या हितचिंतकांना, कार्यकर्त्यांना माझं एक सांगणं आहे की डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे नाईलाजाने मला कुणालाही भेटता येणार नाही त्यामुळे मला कुणीही भेटायला येऊ नये ही माझी एक नम्र विनंती.एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल.

या सर्व कठीण काळात महाराष्ट्राचे आधारवड शरद पवार साहेब, जेष्ठ बंधूप्रमाणे माझी काळजी घेणारे उद्धवजी ठाकरे, सुप्रियाताई सुळे, अनिल देशमुख, जयंत पाटील,.राजेश टोपे, मिलिंद नार्वेकर आणि इतर अनेक लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले मला बळ दिले.

माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती.

महिन्याभरानंतर मी आपल्या सर्वांमध्ये आणि सर्वांसाठी पुन्हा असेल. धन्यवाद

अपने कदमों के काबिलियत पर विश्वास करता हूं

कितनी बार तूटा लेकीन अपनो के लिये जीता हूं

चलता रहूंगा पथपर चलने मैं माहीर बन जाऊंगा

या तो मंजिल मिल जायेगी या अच्छा मुशाफिर बन जाऊंगा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.