Talegaon : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित शिबिरात 120 जणांकडून रक्तदान

एमपीसी न्यूज – सोमाटणे येथे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लाॅकडाऊन सुरु आहे. या परिस्थितीत दवाखान्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या गोष्टीचा विचार करुन पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिरात 120 युवकांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांनी भेट देऊन युवकांना कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले.

यावेळी आढले बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात अत्यावश्यक असलेले पीपीई कीट, N-95 मास्क, थर्मल गन, सॅनिटायझर, ट्रीपल लेअर मास्क इत्यादी वैद्यकीय साधनसामुग्री, साहित्य आरोग्य केंद्रप्रमुख डॉ. सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव, तालुका कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष व सरपंच सुनिल दाभाडे, चंद्रकांत भानुसघरे, सरपंच संजय आवंढे, सरपंच विश्वास घोटकुले, जिल्हा औद्योगिक सेलचे अध्यक्ष संजय गायकवाड, सोशल मिडीया सेलचे अध्यक्ष संजय शेडगे, उत्तम घोटकुले, शरद घोटकुले, हनुमंत घोटकुले, उपसरपंच सुनिल सावळे,जालिंदर म्हस्के, शिवाजी पाथरट, प्रताप घोटकुले, रुपेश घोटकुले, नितेश वाघमारे इतर पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.