Pimpri : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्त आणखी एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असलेक्या एका कोरोनाग्रस्ताचा पुण्यातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आजवर पिंपरी चिंचवड शहरातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर पिंपरी चिंचवडच्या हद्दीबाहेरील मात्र पिंपरीत उपचार घेणाऱ्या चार जणांचा मृत्यू झाला आहे.

भोसरी येथील 81 वर्षीय रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याने तिला पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज, रविवारी (दि. 10) त्या महिलेचा मृत्यू झाला.

दरम्यान, 12 एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका रुग्णाचा आणि पुण्यातील रहिवाशी पण, वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाचा आणि 24 एप्रिल रोजी निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, 29 एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा, 6 मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा आणि येरवडा येथील एका महिलेचा वायसीएम रुग्णालयात अशा सात जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.