Pune News : यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी काँग्रेसतर्फे आदरांजली अर्पण 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष अरविंद शिंदे, (Pune News) माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे  यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हा्ण यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास काँग्रेस भवन येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे म्हणाले की, ‘‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हातण यांनी आपल्या संघटनात्मक कौशल्याने काँग्रेस पक्षाचे व देशाचे नाव आतंरराष्ट्रीय पातळीवर पोहचवले. केंद्रात त्यांनी उपपंतप्रधान, गृह, अर्थ व संरक्षण खाते सांभाळले.(Pune News) तरी महाराष्ट्रावरचे प्रेम त्यांनी कमी केले नाही व सर्वसामान्य गोरगरीबांचे नेते म्हणून ते लोकप्रिय होते. त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व कृतीतून हिमालयाच्या मदतीला सह्याद्री आला अशी म्हण रूजू झाली. त्यांनी त्यांच्या कामातून काँग्रेसचा विचार रूजवून आदर्श तर दिलाच परंतू त्यांच्या विचारांची आज काँग्रेसला गरज आहे. महाराष्ट्रात सर्वजण त्यांना साहेब म्हणायचे त्यांच्याच विचारांनी आपण सर्वजण मिळून काँग्रेस पक्षाची उभारणी करू. अशा या थोर स्वातंत्र्य सेनानीस त्यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.’’

Pimpri News : मोठे उद्योग नेले आता महाराष्ट्रातील गावे इतर राज्यात नेतील – काशिनाथ नखाते

यावेळी ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, उमेश कंधारे, संदिप मोकाटे, द. स. पोळेकर, गुलाम हुसेन, लतेंद्र भिंगारे, अनिस खान, चंद्रकांत नार्वेकर, रविंद्र उकिरंडे, करीम शेख, स्वप्निल, मुन्ना खंडेलवाल आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.