Pune : कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज- कोयत्याचा धाक दाखवून दोघांनी तरुणाचा मोबाइल आणि गळ्यातील सोन्याचे पान हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि.12) रात्री 1 च्या दरम्यान धनकवडी येथील के.के.मार्केट समोरील रस्त्यावर घडली.

याप्रकरणी दत्ता तेलंगे (वय 20, रा.बिबवेवाडी) यानी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता काल रात्री उशिरा त्याच्या दोन मित्रांसोबत घरी पायी निघाला होता. दरम्यान त्याच्याजवळ दोन अनोळखी इसम आले आणि त्यांनी फिर्यादीला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील सोन्याचे पान आणि मोबाईल असा एकूण साडेसात हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला.

याप्रकरणी दोन अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.