Pune Crime : सासरच्या त्रासाला कंटाळून 20 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज : पती तसेच सासू-सासऱ्यांच्या त्रासाला (Pune Crime)  कंटाळून एका 20 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक कारणावरून तिला त्रास देण्यात येत होता. 

दिक्षा अक्षय अडसुळ (वय 20, रा. धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात पती अक्षय तसेच सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीक्षाचे वडिल अनिल पोळ यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार 11 जानेवारी रोजी घडला आहे.

Pune News : चोऱ्यांचे सत्र सुरूच ; कोंढवा, हडपसर परिसरातून कोट्यवधी लंपास

फेब्रुवारी 2022 मध्ये अक्षय व दिक्षी यांचा विवाह झाला होता. विवाहानंतर पती व सासू-सासऱ्यांनी तिला कौटुंबिक कारणावरून त्रास दिला. घालूनपाडून बोलणे, शिवीगाळ करणे तसेच अपमानास्पद वागणूक दिली जात होती. तर, मारहाणही केली जात होती. (Pune Crime) याबाबत कोणाला सांगितल्यास नांदवणार नाही, अशी धमकीही तिला दिली होती. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.