Pune News : दीड वर्षापासून फरार, पण पत्नीला भेटायला आला आणि अलगद जाळ्यात फसला

एमपीसी न्यूज : मोक्काच्या गुन्ह्यात गेल्या दिड वर्षापासून फरार असणारा तसेच पोलिसांनी सतत गुंगारा देण्यात यशस्वी असलेल्या एक आरोपी पत्नीला भेटण्यास (Pune News) आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला. वारजे माळवाडी पोलिसांनी आरोपीला चांदणी चौक या परिसरातून सापळा रचून अटक केली.

नकुल शाम खाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी व कट रचणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात त्याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. वरिष्ठ निरीक्षक डी. एस. हाके, गुन्हे निरीक्षक दत्ताराम बागवे, उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे व त्यांच्या पथकाने केली आहे.

Pune Crime : सासरच्या त्रासाला कंटाळून 20 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

गेल्या वर्षी म्हणजे जुलै 2021 मध्ये दाखल गुन्ह्यात मोक्का कारवाई केली होती. गुन्हा केल्यापासून सुमारे दिड वर्षे तो फरार होता. पोलिसांना गुंगारा देण्यात तो गेल्या दीड वर्षांपासून यशस्वी होत होता. पोलीस नकुलच्या नातेवाईक तसेच मित्रांवर गेल्या तीन महिन्यांपासून पाळत ठेऊन होते. तसेच तो अधून मधून पत्नीला भेटून गेल्याची देखील माहिती मिळाली होती.

दरम्यान तो त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी चांदणी चौकात थांबणार असल्याची माहिती मिळाली. लागलीच वरिष्ठ निरीक्षक डी. एस. हाके, गुन्हे निरीक्षक दत्ताराम बागवे, उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे व त्यांच्या पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण, तो दुचाकीवर बसून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. (Pune News) मात्र, पोलीस नाईक प्रदिप शेलार आणि पोलीस शिपाई बंटी मोरे या दोघांनी पाठलाग करून त्याला पकडले. तर ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.