Pune : दहिहंडीचे फ्लेक्स लावण्याच्या वादातून युवकाचा खून

एमपीसी न्यूज- दहिहंडीचे फ्लेक्स लावण्याच्या वादातून पाच जणांनी तलवारीने वार करून एका युवकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी(दि. 31) रात्री उशिरा सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात घडली.

अक्षय गडशी (वय 23, नॅशनल पार्क सोसायटी, माणिकबाग) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी निलेश चौधरी, सागर दारवडकर व त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

अक्षय गडशी आणि आरोपी एकाच भागात राहतात. काही दिवसांपूर्वी आरोपी व अक्षय यांच्यात दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून वाद झाला होता. त्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने मध्यरात्री माणिकबाग येथील पेट्रोल पंपासमोर अक्षयला गाठून त्याच्यावर तलवारीने वार करून खून केला. याप्रकरणी सिंहगड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.