Rahatani : लग्नाची मागणी करत दिली अ‍ॅसिड फेकण्याची धमकी 

एमपीसी न्यूज –  तरुणीचा पाठलाग करत तिच्याकडे लग्नाची मागणी करत तिला जिवे ( Rahatani ) मारण्याची व अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली. हा प्रकार जानेवारी 2022 ते शुक्रवारी (दि.25) या कालावधीत रहाटणी, चिंचवड, पिंपरी या परिसरात घडला आहे.

याप्रकरणी 20 वर्षीय पीडितेने वाकड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी आनंद दयाराम इंगळे (वय 26 रा. पिंपरी) याला अटक केली आहे.

Pune : बार्टीच्या योजनांसाठी निधी उपलब्ध करून देणार – रामदास आठवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा आरोपी वारंवार पाठलाग करत होता. तू माझ्या सोबत लग्न कर म्हणत तसेच  जर लग्न केले नाही तर तुझ्यावर मी अ‍ॅसिड फेकीन व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. त्याने शुक्रवारी फिर्यादीचा हात पकडून कानाखाली मारली. यावरून वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास ( Rahatani ) करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.