BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri- बजाज कंपनीचे राहुल बजाज संचालक पदावरून निवृत्त होणार

0

एमपीसी न्यूज -बजाज ऑटोचे संचालक राहुल बजाज पदावरून पायउतार होणार आहेत. पण, कार्यकारी संचालक म्हणून ते पदभार सांभाळतील, असे गुरुवारी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राहुल बजाज यांचे वय 75 वर्षे आहे. काही अतिरिक्त तसेच इतर व्यायसाय संबंधी कामांमुळे राहुल बजाज त्यांचा पदभार सोडत आहेत, असे कंपनीच्या नियामक मंडळाने जाहीर केले.

१९७० साली त्यांनी संचालक पदाचा पदभार सांभाळाला होता. त्यानंतर १ एप्रिल २०१५ रोजी त्यांना पुन्हा पुढील ५ वर्षासाठी नियुक्त केले होते. राहुल बजाज यांचा कार्यकाळ या वर्षीच्या ३१ मार्च २०२० रोजी संपेल. परंतु ते कर्यकारी संचालक म्हणून काम पाहतील. संचालक मंडळाने गुरुवारी झालेल्या बैठकीत राहुल बजाज यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.

१ एप्रिल २०२० रोजी भागेदारी असलेल्या वरिष्ठांच्या संमतीने राहुल बजाज यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like