Railway : आरपीएफने वाचवले आठ महिन्यात 44 जणांचे प्राण

एमपीसी न्यूज – रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) कर्मचाऱ्यांनी मागील (Railway) आठ महिन्यात विविध रेल्वे स्थानकांवर 44 जणांचे प्राण वाचवले. काहीजण धावत्या रेल्वेत चढण्याचा, उतरण्याचा प्रयत्न करीत होते. तर काहीजण आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळांवर येण्याचा प्रयत्न करीत होते.

मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी ‘मिशन जीवन रक्षक’ या मोहिमेमध्ये एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून 44 लोकांचे प्राण वाचवले आहेत. यापैकी एकट्या मुंबई विभागात जीव वाचवणाच्या एकूण 21 घटनांची नोंद झाली आहे. भुसावळ विभागात 15 घटना, पुणे विभागात 4, नागपूर विभागात 2 आणि सोलापूर विभागात 2 जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झालेली आहे.

Pune : खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

आरपीएफची प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत होणारा अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच रेल्वे मध्ये आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध पातळ्यांवर कारवाई सुरु असते.

धावत्या रेल्वेत चढणे, धावत्या रेल्वेतून उतरणे अशा प्रकारचा निष्काळजीपणा अनेक प्रवासी करतात. तसेच विविध कारणांमुळे आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या लोकांना देखील आरपीएफने पकडले आहे. रेल्वे सुटण्याच्या वेळेपूर्वी प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर पोहोचावे, धावत्या रेल्वेत चढू अथवा उतरू नये, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.