Pimpri : राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकतर्फे तीन दिवसीय उद्योजकता जागरूकता शिबिर 

एमपीसी न्यूज –  राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय उद्योजकता जागरूकता शिबिराचे आयोजन केले होते. 

यावेळी विद्यार्थांना  योग्य मार्गदर्शन व योग्य निवड व सफल उद्योजक कसे बनाल हे ह्या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश होता.डिप्लोमा इंजिनेरिंग चे एकूण 100 विध्यार्थी ह्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. एकूण तीन दिवसीय कार्यक्रम होते. या कार्यक्रमात डॉ. प्रकाश शर्मा, डॉ विशाल काळे पुणे यांनी मार्गदर्शन केले.

आपल्या स्वतःची संकल्पना, सरकारी योजनांची माहिती व फंडिंग संस्था व विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कॅम्पस संस्थापक  डॉ  पी. पी. वीरकर ,  जेएसपीएम संस्थापक प्रा. सुधीर भिलारे, संस्थापक रवी सावंत, प्राचार्य  डॉ. आर.के.जैन,  प्रा. देवस्थळी, डॉ अमिता दुबे तसेच विविध विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वय डॉ. विजयश्री मेहेता व प्रा अश्विनी गोंजारे व शरद गुंजाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीचेली पोथॅन व योगेश मोहलकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.