Chinchwad : ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघाकडून रक्षाबंधन साजरे

एमपीसी न्यूज – रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या नात्यातील जिव्हाळा दर्शवणारा एक सुंदर सण, या दिवशी बहिण भावाला रक्षारुपी राखी बांधते तर भाऊ बहिणीला रक्षाचे आश्वासन देतो. पण समाजात असे काही रक्षक आहेत जे कोणत्याही अपेक्षा न ठेवता समाजाला आपला परिवार समजून समाजातील प्रत्येक बहिणीचे रक्षण करतात ते म्हणजे आपले ज्येष्ठ नागरिक. याच समाज रक्षकांचा विचार करत ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघाने (Chinchwad) हा सुंदर सण सहकार्याबरोबर साजरा करून त्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.

Chinchwad : आडात नसेल तर, पोहर्‍यात कोठून येणार’ – डॉ. दीपक शहा

बहीण भावाला राखी बांधते. बहिणीचे भावाने रक्षण करावे असे यामध्ये अभिप्रेत आहे. सध्या महिला अबला राहिल्या नाहीत त्या शिक्षणाने, कर्तृत्वाने सक्षम झाल्या आहेत. सबला झाल्या आहेत. तेव्हा रक्षण करायचे असेल तर चांगल्या विचारांचे रक्षण करायला हवे. असे प्रतिपादन यशवंत कण्हेरे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मेजर दत्ता साबळे (सेवानिवृत्त) यांच्या उपस्थितीत भगिनीनी छत्रपती शिवरायांना राखी बांधून कार्यक्रमाला प्रारंभ केला. त्यानंतर मेजर दत्ता साबळे व संघातील सर्व सभासद बंधूंना राख्या बांधून आनंदोत्सव साजरा केला. बहिणीने भावाच्या कल्याणासाठी आणि भावाने बहिणीच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्याबरोबरच दोघांनीही ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत’ अशी ईश्वराला प्रार्थना यावेळी करण्यात आली. शिवानंद चौगुले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.