Wakad :बदनामीची धमकी देत महिलेवर केला बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नापूर्वी असलेल्या प्रेमसंबंधाविषयी पतीला सांगण्याची धमकी देत विवाहित महिलेवर बलात्कार केला. ही घटना रहाटणी येथे घडली .

याप्रकरणी एका 24 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ओंकार रघुनाथ कांबळे (वय 24 रा. रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार याचे लग्न झाले आहे. त्याने त्याच्या बायकोपासून विभक्त होऊन पीडित महिलेशी लग्नाचे अमिश दाखवून प्रेमसंबंध ठेवले. त्यानंतर पीडित महिलेचे लग्न दुस-या तरुणाशी झाले. त्यानंतर देखील आरोपी पीडित महिलेशी प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी करू लागला. त्यासाठी पीडितेने नकार दिला असता लग्नापुर्वीच्या प्रेमसंबंधांविषयी पतीला सांगण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.