Rape Case : 24 वर्षीय मतिमंद तरुणीवर बलात्कार, 58 वर्षीय आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : पुण्यातील मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार (Rape Case) उघडकीस आला आहे. सोसायटीत वॉचमन असलेल्या व्यक्तीच्या 24 वर्षीय मतिमंद तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार करणाऱ्या एका 58 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. ही विशेष तरुणी सहा महिन्याची प्रेग्नेंट राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. डिसेंबर 2021 मध्ये हा सर्व प्रकार घडला. शंकर अंकुश ताकमोगे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका चाळीस वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या बी टी कवडे रस्त्यावरील एका सोसायटीत वॉचमन म्हणून काम करतात. त्याच सोसायटीतील काही लोकांच्या घरी धुनी भांडीचे काम देखील त्या करतात. सोसायटीच्या पार्किंगमध्ये त्यांना राहण्यासाठी एक खोली देण्यात आली आहे. फिर्यादी यांना 24 वर्षे वयाची मतिमंद मुलगी आहे.
दरम्यान फिर्यादी घरी नसताना आरोपीने (Rape Case) तिच्या मुलीच्या मतिमंदपणाचा फायदा घेऊन घरात बोलावले आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून ही तरुणी सहा महिन्याची गर्भवती राहिली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी महिलेने पोलिस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.