Pimpri : बलात्काराच्या घटनेतील आरोपींना कडक शासन करा – शैला मोळक

एमपीसी न्यूज –  मुळशी तालुक्यातील कासारसाई येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणा-या नराधमांना कडक शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर महिला मोर्चा अध्यक्षा शैला मोळक यांनी केली आहे.

यासंदर्भात मोळक यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अॅड. विजया रहाटकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा अॅड. माधवी नाईक यांना मागणीचे निवेदन दिले आहे. गेल्या रविवारी (दि. 16) कासारसाई याठिकाणी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले. त्यात एका पीडितेचा मृत्यू झाला. एक ससून रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेचा तपास अत्यंत गांभिर्याने करण्यात यावा. भक्कम पुरावे गोळा करून आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी शहराध्यक्षा मोळक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन देताना अमित गुप्ता, राकेश गुप्ता, विशाल श्रीवास्तव, सविता कर्पे, सारिका चव्हाण, शोभना बो-हाडे, अर्चना सावंत, प्रियांका बारसे, योगिता नागरगोजे, छाया पाटील, शुभांगी कदम, संगिता सातव, सुप्रिया पाटील आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.