Pune : डीजे बंदीच्या निर्णयाविरोधात, पुण्यातील गणेश मंडळांचा विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार

एमपीसी न्यूज- मुंबई उच्च न्यायालयाने डीजे वाजवण्यावर बंदी घातली आहे. या निर्णयाचं विरोधात पुण्यातील गणेश मंडळांनी यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गणपतीची मूर्ती मांडवातच ठेवण्याचा निर्णय या मंडळांनी घेतला आहे.

डीजे डॉल्बी वर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीमुळे गणेश मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पाहण्यास मिळत आहे.या निर्णया विरोधात पुण्यातील गणेश मंडळ आणि डीजे मालकाची आज पुण्यात बैठक झाली.

मुंबई उच्च न्यायालयाने डीजे वाजवण्यावर बंदी घातल्याने राज्यातील गणेश मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पाहण्यास मिळत आहे. या निर्णया विरोधात पुण्यातील गणेश मंडळ आणि डीजे मालकाची आज पुण्यात बैठक झाली. त्या बैठकीनंतर शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले की, न्यायालयामध्ये डीजे विषयीची भूमिका मांडण्यात सरकार कमी पडले आहे.

न्यायलयाच्या या निर्णयाने हा उत्सव अडचणीत आला असून डीजेवर बंदी आणल्याने आम्ही गणपतीची मूर्ती मंडपात ठेवण्याचा निर्णय बैठकीत झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आता यावर मुख्यमंत्र्यानी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.