Thergaon Crime News : रेशनिंगच्या गहू, तांदुळचा काळाबाजार ; तिघांना अटक, 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – रेशनच्या गहू आणि तांदूळ यांचा काळाबाजार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे तसेच 28.29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ग्रीन मॅपल सोसायटी जवळ, बारणे इंडस्ट्रीयल इस्टेट, थेरगाव येथे शनिवारी (लि.12) हा प्रकार घडला.

ट्रक ड्रायव्हर बाळासाहेब भास्कर जाधव (वय 37) आणि क्लिनर कल्पेश दत्तात्रय कापडी (वय 33, रा. आंबेगाव, पुणे), छोटेलाल राधेश्याम गुप्ता (वय 57, रा. काळेवाडी)अशी अटक आरोपींची नावे आहेत. तसेच, सुरज (रा. आकुर्डी), राहुल बनसोडे (रा. निगडी), आम्ले (रा. रुपी नगर, निगडी), केंद्रे (रा. यमुना नगर, निगडी) आणि मावळे (रा. नारायणगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार प्रवीण केरभाऊ दळे (वय 39) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रेशनिंगचा गहू आणि तांदूळ चढ्या भावाने विक्री करण्यासाठी जवळ बाळगला होता. आरोपीकडे 28.29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 358 पोती गहू, 605 पोती तांदूळ आणि एक ट्रक MH 14 EM 4979 यांचा समावेश आहे. तिघांना ताब्यात घेतले असून, वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.