Ravet : जागेवरील अतिक्रमणप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जागेवर अतिक्रमण (Ravet) करून बळजबरीने ताबा घेत दोघांना शिवीगाळ केली. याप्रकरणी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 20) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास रावेत गावठाण येथे घडली.

पुंडलिक नागू पालेकर (वय 76, रा. सिंधुनगर, प्राधिकरण) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण विठ्ठल खानेकर, प्रकाश विठ्ठल खानेकर, एक महिला (सर्व रा. डांगे चौक, थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi : पीएमपीएमएल कंट्रोलरच्या सतर्कतेने चोरटे गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पालेकर आणि त्यांचे सहकारी भुजंगराव शंकरराव खेनट हे रावेत गावठाण येथील त्यांच्या संस्थेच्या जागेत थांबले असताना आरोपींनी जागेतील पत्र्याच्या शेडला जोरात धक्का देऊन पत्र्याचे नुकसान केले. फिर्यादीस शिवीगाळ करून अंगावर धावून (Ravet) येत गचांडी पकडून धमकी दिली. फिर्यादी यांचे सहकारी खेनट यांनाही शिवीगाळ करून जागेत अतिक्रमण करून ताबा घेतला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.