Ravet News: जलउपसा केंद्रातील रोहित्राच्या दुरुस्तीसाठी 31 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज – रावेत (Ravet News) येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील रोहित्र संच आणि ब्रेकर्सची वार्षिक पद्धतीने देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी एक वर्ष कालावधीकरिता 31 लाख 81 हजार रुपये खर्च होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे रावेत येथे अशुद्ध जलउपसा केंद्र आहे. या केंद्रातून टप्पा एक ते चार अंतर्गत प्रतिदिन सुमारे 600 दशलक्ष लिटर इतका जल उपसा करण्यात येतो. या केंद्रातील 1600 केव्हीए क्षमतेच्या रोहित्र संचाची आणि ब्रेकर्सची सन 2021-22  या कालावधीकरिता वार्षिक पद्धतीने देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच, इतर अनुषंगिक कामे केली जाणार आहेत. या कामासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या.

Housing Societies : मुंबईच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र विभाग करा

निविदादर 44 लाख 12  हजार रुपये निश्चित करण्यात आला. या कामासाठी चार ठेकेदारांनी निविदा (Ravet News) सादर केल्या. त्यापैकी रियल इलेक्ट्रिकल्स या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 27.9  टक्के कमी दराने म्हणजेच 31 लाख 81 हजार रुपये दर सादर केला. महापालिका सहशहर अभियंता यांनी या कामाची निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. एक वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.