Pimpri News : महापालिकेच्या 76 सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचा-यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – सेवानिवृत्त होत असलेल्या अधिका-यांनी आणि कर्मचा-यांनी अनेक वर्षे निष्ठापूर्वक, सातत्याने आणि सचोटीने कामकाज करुन महापालिकेची सेवा केली आहे याचा आदर्श कार्यरत कर्मचा-यांनी घ्यावा असे गौरवोद्गार व कृतज्ञता महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केली.

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे डिसेंबर आणि जून 2021 अखेर सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त होणा-या कर्मचा-यांचा सत्कार समारंभ आज संपन्न झाला त्यावेळी महापौर ढोरे बोलत होत्या. सेवानिवृत्ती कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, बाळासाहेब कापसे, गणेश भोसले, तुकाराम गायकवाड, संजय साळवी तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

माहे डिसेंबर 2021 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांमध्ये शल्यचिकित्सक संजय पाडळे, लेखाधिकारी किशोर शिंगे, उपअभियंता अरविंद माळी, कार्यालयीन अधिक्षक निशा आहेर, मुख्य आरोग्य निरिक्षक अभिजित गुमास्ते, असिस्टंट मेट्रन सय्यदा जियाउद्दीन, ए.एन.एम. शामला घोडके, मुख्य लिपिक विनोद शिंदे, उपशिक्षिका प्रतिभा मसणे, रेश्मा वाळेकर, सुरेखा शिरसट, सहाय्यक शिक्षिका गौसिया खान, लिपिक संजय बोधे, हार्टीकल्चर सुपरवायझर चंद्रकांत मोरे, वाहन चालक मन्मथ चव्हाण, रखवालदार तानाजी दाभाडे, दिलीप केदारी, सफाई कामगार कमलिनी लोंढे, सुमन वाघमारे, सफाई सेवक मुन्नीदेवी सौदे यांचा समावेश आहे.

माहे डिसेंबर 2021 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेणा-या कर्मचा-यांमध्ये कार्यालयीन अधिक्षक लाजवंती चंदीरामाणी, बाळू गंधट, रखवालदार कमलाकर क्षिरसागर, सफाई कामगार जयश्री कांबळे, विमल भूलांडे, कचरा कुली दिलीप गायकवाड यांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माहे जून 2021 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला नव्हता त्याही अधिकारी, कर्मचा-यांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

माहे जून 2021 मध्ये नियम वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी रमेशकुमार जोशी, लेखाधिकारी प्रदिप बंडागळे, उपअभियंता रामेश्वर मोहाडीकर, सुरक्षा अधिकारी विलास वाबळे, मुख्यध्यापिका कल्पना वाघमारे, रेहाना अत्तार, उपलेखापाल सुभाना जेतवन, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुनिल वरघडे, सहाय्यक उद्यान निरिक्षक गोविंद खैरे, हार्टीकल्चर सुपरवायझर तानाजी गायकवाड, सहाय्यक शिक्षक अशोक सुरवसे, उपशिक्षिका शोभा खटाटे, कल्पना तळेकर, उपशिक्षक नामदेव फलफले, आरोग्य निरिक्षक नवनाथ गायकवाड, मुख्य लिपिक महेंद्र वाघमारे, गुलाब राजपूत, विठ्ठल गायकवाड, प्रकाश गोसावी, वाहन चालक सुर्यकांत शेवकरी, आरेखक संजय निघोजकर, मिटर निरिक्षक महेंद्र बोराडे, वायरमन संभाजी बो-हाडे, अनिल सांडभोर, रोप विक्रेता अशोक सोमासे, सुरक्षा सुपरवायझर नारायण मोहिते, मुकादम शेखर काटे, रखवालदार दिलीप आंब्रे, वामन जाधव, देवराम लंगोटे, दिलिप मापारी, शिपाई एकनाथ येचवाड, संभाजी लांडगे, वॉर्ड बॉय शहाजी तळेकर, मजूर सखाराम तरटे, गोरख देवकाते, अनिल जाधव, आया रंजना गायकवाड, मार्गारेट चांदणे, सफाई कामगार सुमन वेताळे यांचा समावेश आहे.

तर माहे जून 2021 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेणा-या कर्मचा-यांमध्ये सफाई कामगार लक्ष्मी मुरगंडी, भाऊसाहेब बरकडे, करुणा शिंदे, खंडू पोटे, संजू भिंगारे, शांताबाई बांबे, सफाई सेवक मिलिंद डोईफोडे, कचराकुली राजू कदम, गटरकुली रामा मंजाळ, राणु ठोकळ यांचा समावेश आहे.

महापौर माई ढोरे यांनी सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचा-यांना स्वत:चे तसेच कुटुंबियांचे आरोग्य जपावे, आनंदी जीवन जगावे असे सांगून नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.