Pune : घरफोडी करणारे दोन सराईत गजाआड; तब्बल साडेबारा लाखांचा ऐवज हस्तगत (व्हिडिओ)

पुणे शहरातील घरफोडींचे 23 गुन्हे उघडकीस

एमपीसी न्यूज – घरफोडी करणाऱ्या अट्टल सराईतांना पोलिसांनी कात्रज चौकातून ताब्यात घेऊन त्यांनी चोरी केलेला जवळपास साडेबारा लाखांचा ऐवज हस्तगत केला.
गजराज मोतीलाल वर्मा (वय 34, रा.कुपवाड, कवठेमहांकाळ) व गोरे उर्फ गणेश रती राणा (खडी मशीन चौक, पुणे), अशी या चोरट्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई फरांदे आणि सोनुने यांना खबऱ्याकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार जेलमधून सुटल्यापासून पुन्हा घरफोडी करणारे गजराज व गणेश हे कात्रज चौकात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कात्रज चौकात जाऊन त्या दोघांचा शोध घेतला असता ते दोघे तिथेच घुटमळत असताना दिसले. तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत पुणे शहरात वेगवेगळ्या भागात तब्बल 23 घरफोड्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
आरोपींकडून पोलिसांनी एकूण 388 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 43 हजारांची रोकड असा तब्बल 12 लाख 34 हजार 160  रुपयांचा ऐवज जप्त केला. ते दोघेही सराईत घरफोडी करणारे चोरटे असून त्या दोघांवर गजराज वर घरफोडीचे 21 गुन्हे दाखल आहेत तर त्याचा साथीदार गणेशवर 11 गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपआयुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, रघुनाथ जाधव, गजानन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उप निरीक्षक दिनेश शेख, पोलीस हवालदार अस्लम पठाण, अजय खराडे, दिनेश गडांकुश, रिझवान जीनेडी, पोलीस नाईक विशाल भिलारे, अतुल गायकवाड, अशोक माने, तुषार खडके, तुषार माळवतकर, पोलीस शिपाई अजित फरांदे, प्रसाद जंगीलवाड, गणेश नरुटे, गजानन सोनुने, प्रशांत गायकवाड यांनी केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=-jlX3zrLJoU&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.