LPG Gas New Rate : दिलासादायक! व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात

एमपीसी न्यूज – महागाईने होरपळलेल्या परिस्थितीत एक दिलासादायक बाब समोर आली आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आजपासून एलपीजी गॅस (LPG Gas)  सिलिंडरच्या किमतीचे नवे दर जाहीर केले आहेत, तर व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती मात्र जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे.

देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईल या कंपनीने व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात केली आहे. दरम्यान, तेल विपणन कंपन्यांनी आजपासून एलपीजी गॅस (LPG Gas) सिलिंडरच्या किमतीचे नवे दर लागू केले आहेत, त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत सर्वसामान्यांना कोणताच दिलासा मिळालेला नाही.

Maharashtra Board Result 2022 : जूनच्या ‘या’ आठवड्यात लागणार दहावी-बारावीचे निकाल

कुठे कसे दर?

दिल्लीत सबसिडीशिवाय 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत 999.5 रुपये किमतीवर कायम आहे. मुंबईत सुद्धा सिलेंडरचे दर 999.5 इतकेच आहेत. कोलकाता येथे मात्र घरगुती गॅसची किंमत 1026 इतकी आहे, तर चेन्नईमध्ये 1015.50 रुपये इतकी किंमत आहे.

मे महिन्यात तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किंमतीत दोनदा वाढ केली. विनाअनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची (LPG Gas) किंमत पहिल्यांदा 7 मे रोजी 50 रुपयांनी वाढवली, तर लगेचच 19 मे रोजी 3.50 रुपयांनी वाढवण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.