Maharashtra Board Result 2022 : जूनच्या ‘या’ आठवड्यात लागणार दहावी-बारावीचे निकाल

एमपीसी न्यूज : दहावी-बारावीच्या (Maharashtra Board Result 2022) विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बारावीचा निकाल हा जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या प्रारंभी, तर दहावीचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागणार आहे. ही माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 

बऱ्याच दिवसांत प्रतिक्षेत असलेला दहावी-बारावीच्या निकालाला आता थोडे थोडकेच दिवस उरले आहेत. शिक्षण मंडळाचे पेपर तपासणीचे काम आता अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्यामुळे आता निकालाची लगबग सुरू झाली आहे.

FYJC Admission 2022 : यंदाची अकरावी प्रवेश प्रक्रिया आणखी लांबणार? जाणून घ्या सविस्तर…

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हृदयाची धडधड आता वेगावली असून, सर्वांचेच लक्ष किती गुण मिळत आहेत? याकडे लागले आहे.  निकालाशिवाय विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाचे नियोजन करणे अशक्य असते. त्यामुळे हे निकाल वेळेत लागावेत यासाठी महाराष्ट्र बोर्ड (Maharashtra Board Result 2022) अलर्ट भूमिकेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.