RedZone : रेडझोनची हद्द निश्चित करा – उत्तम केंदळे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मौजे निगडी येथील पेठ (RedZone) क्रमांक 20 ते 23 यामधील क्षेत्राची देहू अॅम्युनेशन डेपोच्या बाह्य सिमेपासून 2000 यार्डमध्ये येणाऱ्या रेडझोन क्षेत्राची हद्द निश्चित करावी. त्यासाठी संरक्षण विभागाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी क्रीडा समितीचे माजी सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी शासनाकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. त्यात केंदळे यांनी म्हटले आहे की, केंद्र शासनाने सन 1940-50 मध्ये स्थापन केलेल्या अॅम्युनेशन डेपोसाठी 60 वर्षनंतर देहूरोडच्या बाह्य परिघ हद्दीपासून 2000 यार्डमधील जागा बांधकाम व्यतिरिक्त ठेवण्याचे घोषित करण्यात आले.

Alandi : दारूभट्टी लावल्या प्रकरणी महिलेस अटक

केंद्र शासनाच्या अधिसुचनेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसर 2000 यार्डनुसार रेडझोनच्या हद्दी निश्चित केलेला नकाशा (गुगल/पी-स्केच) जिल्हाधिकारी पुणे यांनी जाहीर केला. या गुगल/पी-स्केच नकाशामध्ये रेडझोन नसताना प्राधिकरण सभेच्या चुकीच्या ठरावामुळे रेडझोन हद्द 200 मीटरने वाढीव झाली. त्याचा फटका यमुनानगर, निगडी कृष्णानगर भागातील दीड-दोन हजार भूखडधारकांना बसला. त्यांचे हस्तांतरण, बांधकाम परवानगी, ना-हरकत दाखले, कर्ज प्रकरणे इ. कामांना स्थगिती आली.

पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण विसर्जित होऊन त्याचे क्षेत्र महापालिकेमध्ये विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून समाविष्ट झालेला आहे. महापालिका व यापूर्वीचे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांचे काही कार्यक्षेत्र देहू अ‍ॅम्युनेशन डेपोच्या बाह्य 2000 यार्डाच्या प्रतिबंधक सिमांकनाने बाधित आहे.

पेठ क्रमांक 20, 21, 22, 23 च्या नकाशामध्ये सर्वे क्रमांकाच्या हद्दी दर्शविण्यात आलेल्या आहेत. नकाशावर सर्व्हे क्रमाकाच्या हद्दीस अनुसरून सर्व्हअरने मोजणी नकाशावर दर्शवलेली रेडझोनची हद्द अध्यारोपण (superimpose), हद्द निश्चित नाही. हद्द निश्चित करण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात (RedZone)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.