Nigdi : पॅन ऑर्थो हॉस्पिटलतर्फे निगडीत मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – पॅन ऑर्थो हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त दि. 7 ते 14 ऑगस्ट या कालावधीत मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये हाडांच्या सर्व प्रकारच्या विकारांचे निदान व उपचार केले जातील. अस्थिरोग विशेषतज्ञांचा मोफत सल्ला, मोफत हाडांची ठिसुळता तपासणी तसेच अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये डॉ. एस. प्रशांत (हात व सुक्ष्म रक्तवाहिन्यांच्या शस्त्रक्रिया तज्ञ) , डॉ. मंदार आचार्य (बालकांचे अस्थिरोग आणि व्यंगोपचार तज्ञ), डॉ. विशाल मोहिते (भूलतज्ञ) यांचे सहकार्य मिळणार आहे. शिबिरात भाग घेण्यासाठी 020- 2764276664, 7447780000, 9112248067 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.