Pimpri News : योग साधनेची प्रतिकृती शहरवासीयांना प्रेरणादायी – डॉ. दीपक शहा

एमपीसी न्यूज –  चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून चिंचवड स्टेशन चौक वाहतूक बेट (Pimpri News) सुशोभिकरण करून देखभाल करण्यास पी.पी.पी. तत्त्वावर मान्यता दिली आहे. या संस्थेच्या वतीने चौकात योग साधनेची प्रतिकृती बसवण्यात आली.

 

प्रतिकृतीच्या उद्घाटन माजी महापौर तुषार हिंगे, नगरसेविका वैशाली काळभोर, मीनल यादव यांच्या हस्ते झाले. कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य बाबासाहेब सांगळे, प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्‍हाडे, प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, आदी सुद्धा उद्घाटनाच्या वेळी उपस्थित होते.

SSC Paper Leak : धक्कादायक : पुण्यात महिला सुरक्षारक्षकाच्या फोनमध्ये सापडला दहावीचा गणिताचा पेपर

 

संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा पुढे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी विविध उपक्रमे राबवित आहे (Pimpri News) युवक वर्गही या साधनेबरोबर जोडला जात आहे योगसाधनेची प्रतिकृती या चौकात शिक्षण, तंत्रज्ञान, शेती व औद्योगिक क्षेत्र स्वरूपात प्रतिबिंबित करण्यात आली आहे व चिंचवड स्टेशन चौक बेट सुशोभिकरण केले हे पाहून शहरवासीयांना उर्जा व प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.