Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे निवृत्त नर्सची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील पंचवटी कॉलनीमध्ये (Talegaon Dabhade) एका सेवानिवृत्त सेविका (नर्स) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना आज (दि.17) दुपारी घडली.

 

भारती दत्तू (हिंगणे) सोनावणे (वय 56) असे मयत महिलेचे नाव आहे.

 

Talegaon News : प्रदिप नाईक यांचा अंनिस वर बंदी घालण्याचा अर्ज गृह विभागाकडे

 

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भारती या तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्या केंद्रात  नर्स होत्या. त्या सेवा निवृत्त झाल्या होत्या. त्यांनी आपल्या राहत्या घरात बेडरुममध्ये ओढणीने (Talegaon Dabhade) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्या तळेगाव येथे त्यांच्या पती सोबत रहात होत्या. तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा करत असून अद्याप आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.