Pimpri News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे ‘निधी आपके निकट’ कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – कर्मचारी भविष्य निर्वाह संघटने निर्वाह निधी (Pimpri News) संघटना प्रादेशिक कार्यालय पुणे दोन द्वारे ‘निधी आपके निकट ‘कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड सायन्स पार्क ग्रुप, डी मार्ट च्या मागे ,ऑटो क्लस्टर एक्जीबिशन सेंटर जवळ येथे होणार आहे.

 

‘निधी आपके निकट या कार्यक्रमामध्ये सर्व कंपनी मालक आणि कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी कायद्यातील कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांबद्दल सांगितले जाईल. तसेच त्यांच्या समस्या शंका आणि अडचणी सोडवल्या जातील. या कार्यक्रमाचे देशभरातील 500 जिल्ह्यांमध्ये आयोजन करण्यात आले आहे; जेणेकरून अधिकाधिक भागधारक नियुक्ती पेन्शनधारक या कार्यक्रमात सहभागी होतील व आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा फायदा करून  घेतील.

 

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे निवृत्त नर्सची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व अस्थापनांचे मालक व कर्मचारी यांनी अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमात सहभागी होऊन भविष्य निर्वाह निधी संदर्भात त्यांच्या समस्या शंका आणि इतर माहिती बाबत फायदा करून घ्यावा,असे आवाहन आयोजकांतर्फे (Pimpri News) करण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.