Radha Mangeshkar : पिंपरी-चिंचवड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने राधा मंगेशकर यांची मंगळवारी प्रकट मुलाखत

एमपीसी न्यूज – ख्यातनाम पार्श्वगायिका राधा हृदयनाथ मंगेशकर (Radha Mangeshkar) यांच्या सांगीतिक कारकिर्दीबद्दल पिंपरी-चिंचवड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी (दि.6) प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मुलाखत दुपारी साडेबारा वाजता पुण्यातील एनडीए रोडवरील झपूर्झा या म्युझियम ऑफ आर्ट अँड कल्चरल सेंटरमध्ये होणार आहे.

ही मुलाखत फाऊंडेशनचे अध्यक्ष व लायन्स क्लब ऑफ पुणे चतु:श्रुंगीचे प्रेसिडेंट विजय भिसे घेणार आहेत. यावेळी धनंजय भिसे व अनिता भिसे लिखित ‘लंडन-स्विस- पॅरिस एक अविस्मरणीय अनुभव’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नाना काटे, निर्मला कुटे,सुजाता पालांडे, शंकर जगताप, ज्ञानेश्वर उर्फ माऊली लांडे पाटील, चंदाताई भिसे व कुंदा भिसे उपस्थित राहणार आहेत.

Duplicate Eknath Shinde : डुप्लिकेट मुख्यमंत्र्यांना गणरायाच्या आरतीची आमंत्रणे

पार्श्वगायन क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळविलेल्या (Radha Mangeshkar) मंगेशकर घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व राधा मंगेशकर या करत असून आपल्या आयुष्यातील व कुटुंबातील कडू-गोड आठवणी आणि प्रसंग मुलाखतीच्या माध्यमातून त्या उलगडून सांगणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.