Duplicate Eknath Shinde : डुप्लिकेट मुख्यमंत्र्यांना गणरायाच्या आरतीची आमंत्रणे

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Duplicate Eknath Shinde) यांच्यासारख्याच दिसणाऱ्या विजयराज माने या तरुणाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. मुख्यमंत्र्यासारखीच दाढी, तसाच गॉगल, तसेच कपडे आणि तसाच फेटा घातलेला हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी अनेकांनी शेअर केला होता. तेव्हा देखील त्याच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, हा तरुण आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण अनेक गणेश मंडळाकडून त्याला आरतीची आमंत्रणे येत आहेत. मुख्यमंत्री नाही आले तर काय झालं डुप्लिकेट मुख्यमंत्री तर आहेत ना.. असे म्हणून अनेक मंडळ त्याला आरतीसाठी बोलावताना दिसतात.

एखाद्या व्यक्तीची डुप्लिकेट असणाऱ्यांना कधी फायदा होतो, तर कधी नुकसान. मात्र विजयराज माने यांच्यासोबत काहीसे उलटे झाले. मुख्यमंत्र्यांसारखा दिसणाऱ्या विजयराज माने यांना अनेक उद्घाटनाला बोलावलं जातं. तर ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी लोक त्यांच्यासोबत सेल्फी घेतात. इतकच नाही तर काही नागरिक कामाचे प्रस्ताव आणि निवेदन घेऊनही त्यांच्या घरी जातात. आता गणेशोत्सवात तर विजयराज माने यांना खूप भाव आलाय. कारण अनेक गणेश मंडळांनी प्रमुख पाहुणा म्हणून त्यांना आमंत्रित केले आहे.

PCMC : दिव्यांग व्यक्तीशी लग्न केल्यास 1 लाखाचे अर्थसहाय्य; 5 वर्षात 63 जणांनी घेतला योजनेचा लाभ

विजयराज माने हे हुबेहूब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Duplicate Eknath Shinde) यांच्यासारखे दिसतात. त्यांनी वाढवलेली दाढी, कपाळावरचा टिळा आणि ते परिधान करत असलेले कपडे हे सर्व पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री तर सगळीकडे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे हुबेहूब त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या विजयराज माने यांना मात्र सध्या चांगलाच भाव आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.