Corus India Company : टँकरच्या धडकेत तरुण कामगार ठार

एमपीसी न्यूज : कंपनीच्या गेटवर कार्ड पंचिंग करत असलेला तरुण कामगार पाण्याच्या टँकर खाली चिरडून ठार झाल्याची घटना रविवारी (दि. 4 सप्टेंबर) सकाळी सहाच्या सुमारास घडली. चाकण औद्योगिक वसाहतीत खराबवाडी (ता. खेड) येथील कोरस इंडिया कंपनीच्या (Corus India Company) प्रवेशद्वारावर हा अपघात झाला.

Duplicate Eknath Shinde : डुप्लिकेट मुख्यमंत्र्यांना गणरायाच्या आरतीची आमंत्रणे

अजिंक्य अशोक चाळक (वय 19, सध्या रा. खराबवाडी, मूळ कळम, जि. उस्मानाबाद) असे या अपघातात ठार झालेल्या तरुण कामगाराचे नाव आहे. अजिंक्य सकाळी पहिल्या पाळीसाठी कामावर आला होता. सकाळी साडेसहाच्या सुमारास कंपनीच्या प्रवेशद्वारावर कार्ड पंचिंग करून कामावर जात असताना कंपनीतून आलेल्या पाण्याच्या टँकर खाली चिरडून तो ठार झाला आहे. यामध्ये आणखी एक जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. महाळुंगे पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.