Pune Crime News : नात्यात मामा असलेल्या नवऱ्यापासून घटस्फोटासाठी लग्नाच्या आठ वर्षानंतर न्यायालयात धाव

एमपीसी न्यूज – हिंदू कायद्यानुसार भारतात मामा आणि भाचीच्या लग्नाला परवानगी नाही. मात्र आजही काही ठिकाणी अशा प्रकारची लग्न होताना दिसतायेत. अशाच एका प्रकारात मामा असलेल्या नवऱ्यापासून घटस्फोट मिळावा यासाठी भाचीने लग्नाच्या तबल आठ वर्षानंतर न्यायालयात धाव घेतली. वैचारिक मतभेदामुळे दोघात वाद निर्माण होऊ लागले. अखेर हा वाद टोकाला गेला आणि त्यानंतर दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक  (Pune Crime News) न्यायालयात धाव घेतली. 

 

LPG : घरगुती सिलिंडर पुन्हा महागला; सामान्यांचे बजेट कोलमडले

 

 

पंकज (वय 35) आणि ऋतुजा (वय 28)  दोघांचीही नावे बदलली आहेत. दोघेही पुण्याचे राहणारे आहेत. नात्याने मामा भाची असलेल्या या दोघांनी नातेवाईकांच्या आग्रहास्तव लग्न केले. सुखाने संसार सुरू असताना दोघांना एक गोंडस मुलगी ही झाली. त्यांची मुलगी सहा वर्षाची आहे. मात्र सर्व काही सुरळीत असताना मागील दोन वर्षांपासून त्यांच्यात वादाला (Pune Crime News)  तोंड फुटले. वैचारिक मतभेद होऊ लागले. अशा प्रकारचे वाद सातत्याने होत असल्याने इथून पुढे आपण एकत्र राहू शकत नसल्याचे दोघांनाही वाटल्याने 2020 पासून ते वेगवेगळे राहू लागले.

 

Municipal Corporation :  महापालिकेमार्फत नागरिकांकरीता व्हॉटसॲप- चॅट बॉट प्रणाली!

 

त्यानंतर या दोघांनीही अॅड. अजिंक्य गायकवाड यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. यात विशेष म्हणजे ऋतुजाने पोटगी न मागता केवळ मुलीचा ताबा मागितला आहे. घटस्फोटासाठी केलेल्या अर्जात विविध अटी शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.