Uddhav Thackeray : झाले गेले विसरून पुन्हा पक्षासाठी काम करणार, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर आढळराव यांची प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे वृत्त आले होते. मात्र त्यानंतर अवघ्या काही वेळातच नजरचुकीने हे घडल्याचे सांगत आढळराव पाटील हे शिवसेनेचे असल्याचे सांगण्यात आले होते. नंतर आढळराव पाटील मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा झाले गेले विसरून पुन्हा पक्ष वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. 

आपल्यावरील कारवाई नजरचुकीने झाली आहे. त्याबाबत पक्षाने दिलगिरी व्यक्त केली आहे. आपण अनेक वर्षे पक्षासाठी आणि मतदारसंघासाठी झटलो आहोत प्रामाणिकपणे काम केले आहे. अवघ्या काही महिन्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी लवकरच शिरूर मतदार संघाचा दौरा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी आढळराव पाटलांना मातोश्री भेटीदरम्यान सांगितलं.

 

LPG : घरगुती सिलिंडर पुन्हा महागला; सामान्यांचे बजेट कोलमडले

 

 

 

रविवारी अचानक आढळराव पाटील यांच्या हकालपटीचे वृत्त आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर बोलताना ते म्हणाले होते मागील 18 वर्षांपासून मी पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आहे. पंधरा वर्षे खासदार असताना भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. मात्र अचानक अशा प्रकारे हकालपट्टी झाल्याने मी बेचैन झालो आहे. व्यवसाय कुटुंबाकडे दुर्लक्ष करून मी शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिले आहे.

 

 

 

Brahmin Federation : केंद्रीय यंत्रणांकडून ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना सतर्क राहण्याचा इशारा

 

 

मंगळवारी झालेल्या उद्धव ठाकरे आणि आढळराव यांच्या भेटीत उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray)  यांनी ऐकून घेतले. शिवसेनेचे काम प्रामाणिकपणे केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. झाले गेले विसरून पुन्हा जोमाने काम करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार निवडून आणा. तसेच लवकरच आपण शिरूर मतदार संघाचा दौरा करण्यासाठी त्यांनी या भेटीत सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.