Talegaon Dabhade : संघर्ष करिअर अकॅडमीतर्फे धावण्याची स्पर्धा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील संघर्ष करिअर अकॅडमीने 1600 मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित केली.यामध्ये वन नेस अकॅडमी भोसरीचा गणेश आठवले याने प्रथम, आर.सी.अकॅडमी भोसरीचा चन्ना केशव कलाल याने दुसरा, संघर्ष करिअर अकॅडमी तळेगाव दाभाडेचा आकाश मोरे तृतीय आणि यशदिप करिअर अकॅडमी, राजगुरुनगरचा ऋतिक इंगळे याने चौथा क्रमांक पटकावला. ही स्पर्धा रविवारी (दि.21) देहूरोड येथील आर्मी ग्राउंडवर घेण्यात आली.

संघर्ष करिअर अकॅडमी तळेगाव दाभाडे आयोजित 1600 मी धावणे स्पर्धा आज आर्मी ग्राउंड देहूरोड या “ठिकाणी झाली. स्पर्धेला सुनिल पवार, महादेव माळी, गोरख काकडे, युनूस पटेल, पप्पु खानेकर, तुषार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक – गणेश आठवले (वन नेस अकॅडमी,भोसरी), व्दितिय क्रमांक – चन्ना केशव कलाल (आर.सी.अकॅडमी भोसरी ) तर तृतीय क्रमांक – आकाश मोरे (संघर्ष करिअर अकॅडमी,त.दा.),चतुर्थ क्रमांक – ऋतिक इंगळे (यशदिप करिअर अकॅडमी,राजगुरुनगर) यांनी पटकावला.

स्पर्धेमध्ये मावळसह राजगुरुनगर, पिंपरी चिंचवड, भोसरी, ठाणे येथील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे यशस्वी नियोजन विशाल मोरे सर, अशितोष तरडे सर, अनिकेत उडाफे सर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.