Pimpri : विक्रम नढे पाटील यांची जगातील पहिल्या तरंगत्या राष्ट्रीय उद्यानाच्या जिल्हा वन अधिकारी पदी नेमणूक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडमधील विक्रम सुरेश नढे पाटील यांची मणिपूर ( Pimpri) येथील जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान, कैबुल लामजाव राष्ट्रीय उद्यानाच्या डायरेक्टर/ जिल्हा वन अधिकारी पदी नेमणूक करण्यात आली आहे.विक्रम नढे यांनी मणिपूर मधील कांगपोकपी जिल्ह्यामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आली आहे.

विक्रम नढे यांचे मूळ गाव पिंपरी चिंचवड मधील रहाटणी काळेवाडी हे असून ते पिंपरी-चिंचवड माहापालिकेचा माजी नगरसेवक सुरेश नढे पाटील यांचे पुत्र आहेत. त्यांच्या या नेमणुकीमुळे पिंपरी-चिंचवडकरांचे नाव आता मणीपुर व पर्यायाने जगापर्यंत पोहचले आहे.

Pimpri : निरंकारी मिशनमार्फत पुणे जिल्ह्यामध्ये एकाच वेळी 43 ठिकाणी होणार स्वच्छता अभियान

मणिपूर येथील कैबुल लामजाओ हे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे. हे राष्ट्रीय उद्यान सध्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत आहे. संगाई हरीण नैसर्गिक अधिवासात आढळणारे कैईबुल हे एकमेव ठिकाण आहे.अशी महत्त्वाची जवाबदारी एका मराठी अधिकाऱ्याला मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे.

विक्रम नढे हे 2020 बॅच चे मणिपूर कॅडर चे आय एफ एस अधिकारी आहे. नढे हे यापूर्वी चुराचांदपुर आणि कंगपोकपी येथे कार्यरत होते.नढे यांनी यापूर्वी विकसित भारत संकल्प यात्रा चा नोडल अधिकारी पदाचीही जवाबदारी यशस्वी रित्या सांभाळली ( Pimpri) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.