Pimpri : रमजान महिन्यातील पाणीकपात रद्द करण्याची समाजवादी पक्षाची मागणी

एमपीसी न्यूज –  मुस्लिम समाजाचा पवित्र महिना मंगळवार (दि. ७) पासून सुरु झाला आहे. या काळात शहरात पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाणी कपात सुरू केली आहे. रमजान महिन्यातील उपवास तसेच तीव्र उन्हाळा यामुळे पाण्याची मागणी अधिक आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करुन मुस्लिम बांधवाना दिलासा द्यावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष रफीक कुरेशी यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पवित्र रमजान महिला मंगळवारपासून सुरु झाला आहे. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या महिन्यात उपवास करतात. तसेच शहरात उकाडा मोठ्या प्रमणात आहे. त्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे. पालिकेने सोमवार दि.६ मे पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. ही पाणीकपात रद्द करुन दररोज पूर्वीप्रमाणे एकवेळ पाणीपुरवठा करावा आणि शहरातील मुस्लिम बांधवांना  दिलासा द्यावा, अशी मागणी कुरेश यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.