_MPC_DIR_MPU_III

Sambhaji Bhide News : कोरोनाने जी माणसे मरतात ती जगण्याला लायक नाहीत; संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

0

एमपीसी न्यूज – जे लोक कोरोनाने मरत आहेत, ती जगण्याला लायक नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. कोरोना हा रोग नसून तो मानसिक आजार असल्याचेही भिडे यांनी म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_IV

या वक्तव्यामुळे संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. भिडे म्हणाले, “कोरोना हा रोग नाही. जी लोकं कोरोनाने मरतात ती जगायला लायक नाहीत. दारूची दुकाने उघडी त्याला परवानगी आहे. कुठे एखादा विक्रेता काही विकत असेल तर पोलीस त्याला काठ्या मारतात. हा नालायकपणा आहे.

_MPC_DIR_MPU_II

लोकांनी याविरोधात बंड करून उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे. हे अजिबात उपयोगाचं नाही. मी काही राजकीय व्यक्ती नाही. माझ्यासारखे असंख्य लोक संबंध देशात अस्वस्थ आहेत. हा मूर्खपणा चाललाय, कोरोना हा रोगच नाही. हा मानसिक रोग आहे. काही होत नाही, असेही भिडे यांनी म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment