Sangavi: महेश मंडळ आयोजित रक्तदान शिबिरात 47 जणांचे रक्तदान

महेश मंडळतर्फे आयोजित 21 व्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या  प्रादुर्भावामुळे  रक्तपेढीत असलेली कमतरता या पार्श्वभूमीवर सांगवी परिसर महेश मंडळतर्फे आयोजित 21 व्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. 47 जणांनी रक्तदान केले.

कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करीत पिंपळे सौदागर येथील शिवम सोसायटीमध्ये आयोजित शिबिराचे उद्घाटन महिला बाल कल्याण समितीच्या माजी सभापती निर्मला कुटे यांच्या हस्ते करण्यात आले.

राम बांगड, संदीप भोळे, सतीश लोहिया आदी उपस्थित होते. रक्तसंकलनसाठी आचार्य आनंदऋषी पुणे रक्तपेढ़ीने सहकार्य केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश अटल, पंकज टावरी, संजय मुंदडा, मनोज आरमरकर यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.