Sangvi : एसबीआय बँकेच्या बनावट एटीएम कार्डद्वारे ग्राहकांच्या खात्यातील रक्कम लंपास

एमपीसी न्यूज – एसबीआय बँकेचे बनावट एटीएम कार्ड बनवून त्याद्वारे बँकेच्या पाच ग्राहकांच्या खात्यातून एकूण 1 लाख 62 हजार 700 रुपये काढून घेतले. हा प्रकार 7 सप्टेंबर 2018 ते 30 जुलै 2019 या कालावधीत मुंबई, पुणे, झारखंड येथील एटीएम मध्ये घडला.

शाखा व्यवस्थापक नीलम कुमारी यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलम कुमारी एसबीआय बँकेच्या नवी सांगवी शाखेच्या शाखा व्यवस्थापक आहेत. स्नेहल आर चौगुले, प्रमोद जे शिंदे, आशिष अशोक कांबळे, अर्चना एन शेलार, मोहन केशव ताजणे हे त्यांच्या बँकेचे ग्राहक आहेत. अज्ञात आरोपींनी या पाच ग्राहकांच्या खात्याचे बनावट एटीएम कार्ड बनवले.

त्याआधारे आरोपींनी बांद्रा, भिवंडी, झारखंड मधील देवघर, गणेश हॉटेल पुणे, सदाशिव पेठ पुणे येथे कार्ड वापरून पाच ग्राहकांच्या खात्यातून 1 लाख 62 हजार 700 रुपये काढून घेतले. ही बाब उघडकीस येताच शाखा व्यवस्थापक नीलम कुमारी यांनी पोलिसात गुन्हा नोंदवला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.