Wakad : सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरीचा थेरगाव परिसरात राडा

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी याने हातात कोयता घेऊन थेरगाव परिसरात राडा घातला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

अनिकेत अर्जुन चौधरी (वय 21, रा. पाषाणकर निवास, प्रेरणा शाळेजवळ, लक्ष्मणनगर, थेरगाव) याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

  • अनिकेत चौधरी हातात धारदार शस्त्र घेऊन त्याच्या साथीदारांसह दुचाकीवरून आला. त्याने थेरगाव येथे थांबलेल्या तरुणांसोबत राडा घातला. ही घटना गुरुवारी (दि. 8) रात्री अकराच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दी मारामारी, दरोडा, दंगा, वाहनांची तोडफोड, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे केल्याप्रकरणी अनिकेत चौधरी याच्यावर वाकड पोलिसांनी घातक कारवाया प्रतिबंध कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली आहे.

  • पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ही पहिली ‘एमपीडीए’ची कारवाई आहे. एक वर्षासाठी त्याची कारागृहात रवानगी केल्यानंतर तो वर्षपूर्ती अगोदरच बाहेर येऊन असे उच्छाद मांडत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.