BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीस

एमपीसी न्यूज – सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 15) सकाळी पिंपळेगुरव येथे उघडकीस आली.

हरीश सयतान मोरे (वय 19, रा. पिंपळे गुरव, सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी हरीश यांनी त्यांची (एम एच 12 / सी ई 7867) ही दुचाकी गणेश नगर, पिंपळे गुरव येथील डोंगरे बिल्डींगच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3