Sangvi : महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करून तिला मारहाणही करण्यात आली. ही घटना पिंपळे निलख येथे बुधवारी (दि. 9) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

अभि दिलीप सपकाळ (वय 34, रा. थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 38 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला पिंपळे निलख येथील सावित्रीबाई फुले उद्यानाजवळ आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. त्यावेळी तिथे आलेल्या फिर्यादी यांचा मित्र सपकाळ याने त्यांचा विनयभंग केला. त्याला विरोध केला असता त्याने फिर्यादी महिलेला मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचे फोनमध्ये असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तुझ्या घरच्यांना मधे आणल्यास मारून टाकेल, अशी धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.