Sangvi Crime News : पिस्टलचा धाक दाखवून बँक मॅनेजरला लुटले; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पिस्टल सदृश हत्याराचा धाक दाखवून बँक मॅनेजरला लुटले. दगड मारून मॅनेजरच्या गाडीचे नुकसान केले. ही घटना बुधवारी (दि. 1) मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

अनिकेत उर्फ उऱ्या आकाश उरणकर (वय 21, रा. मार्केटयार्ड, पुणे), विघ्नेश गुणशीलन रंगम (वय 22, रा. पिंपळेगुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत विजय त्रिंबक खेडेकर (वय 49, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या कारमधून जात होते. ते त्यांच्या सोसायटीच्या गेट समोर आले असता दोन्ही आरोपींनी पिस्टल सदृश हत्यार दाखवून त्यांच्याकडील एक हजार रुपये रोख रक्कम, बँकेचे आय कार्ड जबरदस्तीने काढून घेतले.

त्यांनतर फिर्यादीवर दगड उगारून फेकून मारला. मात्र फिर्यादीने दगड चुकवला असता दगड कारच्या मागील बाजूला लागला. कारची काच फुटून 10 हजार रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.